'शिवभोजन थाळी' आता संध्याकाळीही मिळणार; गोरगरीबांना मोठा दिलासा

Shiv Bhojan Thali
Shiv Bhojan Thaliesakal

कोंडवे (सातारा) : राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवभोजन योजना तयार करण्यात आली. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादी लोकांचे जेवणाअभावी हालअपेष्ठा होत आहे. ही बाब लक्षात घेवून सद्यस्थितीत शासन निर्देशान्वये शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. (Now You Can Also Get Shiv Bhojan Thali At Night Satara Marathi News)

Summary

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादी लोकांचे जेवणाअभावी हालअपेष्ठा होत आहे.

या योजनेंतर्गत सकाळी 9 ते 12 या वेळेत ही थाळी उपलब्ध करून दिली जाते. परंतु, दुपारच्या वेळी शिवभोजन योजनेचा लाभ घेतल्यानंतर राञीच्या जेवणाची कोणतीही सोय नसल्याने अनेक लोक उपाशी राहत आहेत. कडक लाॅकडाउनच्या (Maharashtra Lockdown) पार्श्वभूमीवर लहान-मोठे अशा सर्वांचीच खाण्याची आबाळ होत आहे. त्यांच्या संध्याकाळच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी सातारा शहरात कार्यान्वित असलेल्या शिवभोजन चालकांकडून त्यांच्या केंद्रावरून दुपारचे जेवण नेणा-या गरीब व गरजू व्यक्तींसाठी तसेच ज्या लाभार्थ्यांना काही कारणास्तव शिवभोजन केंद्रांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही, अशा लाभार्थ्यांची उपासमार होऊ नये, म्हणून त्यांच्यासाठी कोणत्याही अनुदानाची अथवा मोबदल्याची अपेक्षा न करता सेवाभावी वृत्तीने यथाशक्ती जेवण-खिचडी वाटप दररोज सायंकाळी करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यतः सातारा शहरातील विविध प्रभाग, झोपडपट्ट्यातील गरीब व गरजू व्यक्ती, पुलांखाली मुक्काम करणारे तसेच एसटी स्टॅंडवर मुक्काम करणारे बेघर लोक, फिरस्ते, कारागिर, मजूर इत्यादींचा समावेश असणार आहे.

Shiv Bhojan Thali
Frogmouth Bird : परदेशी गिधाडानंतर 'सह्याद्री'त श्रीलंकन फ्रॉग माउथचं दर्शन

शिवभोजन केंद्रचालक हे जेवण-खिचडी बनवून, स्वतःच्या वाहनातून गरजूंपर्यंत पोहोचून पोलिस बंदोबस्तात त्याचे वाटप करणार आहेत. वाटपाच्या ठिकाणी गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तसेच सामाजिक अंतर पाळले जावे, यासाठी पोलिस कर्मचारी यांची मदत घेतली जाणार आहे. रात्रीच्या वेळच्या जेवणासाठी शिवभोजन चालक हे स्वयंस्फूर्तीने त्यांच्याजवळील अन्नधान्य, तेल इत्यादी वापरणार असून लाभार्थ्यांची असणारी मोठ्या प्रमाणावरील संख्या विचारात घेता समाजातील दानशूर व्यक्ती, समाजाच्या हितासाठी काम करणा-या सेवाभावी संस्था यांच्याकडून धान्य, तेल रूपात मदत प्राप्त करून घेऊन त्याचा वापर करण्यात येणार आहे.

Shiv Bhojan Thali
Krishna Factory Election : 'कृष्णा'चा अर्ज दाखल करण्यासाठी आता उमेदवार-सूचकांनाच प्रवेश

सातारा शहरासोबतच सातारा जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी जिथे शिवभोजन केंद्रे आहेत, त्या ठिकाणी ही अशारितीने वाटप करण्यात येणार आहे. तालुक्याचे तहसीलदार व तालुका पुरवठा यंत्रणेमार्फत याचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. याकामी सातारा शहरातील ज्या दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांना या उपक्रमासाठी धान्य स्वरूपात मदत करावयाची आहे, त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून आपली मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे. अन्न तालुक्यांतील दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार किंवा पुरवठा शाखेशी संपर्क करा. आर्थिक स्वरूपाची मदत स्वीकारली जाणार नसल्याने कोणीही कृपया आर्थिक स्वरूपाची मदत करू नये, असे आवाहनही देवकाते यांनी केले आहे.

Now You Can Also Get Shiv Bhojan Thali At Night Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com