
सातारा: विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे आरोग्य अधिकारी, कर्मचारी गेल्या १३ दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तरीदेखील शासनाने मागण्यांसंदर्भात कुठलाही तोडगा काढला नाही. कर्मचाऱ्यांनीदेखील ऐन गणेशोत्सवात जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाच्या ठिकाणीच सत्यनारायणाची पूजा घालत मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार केला.