पाच तालुक्यांत बाधित संख्‍या शून्‍यावर; कोरोनाची आणखी 21 जणांना बाधा | Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच तालुक्यांत बाधित संख्‍या शून्‍यावर; कोरोनाची आणखी 21 जणांना बाधा

पाच तालुक्यांत बाधित संख्‍या शून्‍यावर; कोरोनाची आणखी 21 जणांना बाधा

सातारा : जिल्‍हा आरोग्‍य यंत्रणेने जाहीर केलेल्‍या अहवालानुसार आज जिल्‍ह्यात २१ जणांना कोरोनाची बाधा झाल्‍याचे समोर आले असून, पाच तालुक्‍यांत आज एकही बाधित सापडलेला नाही. गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव कमी होत चालल्‍याने जिल्‍हावासियांनी सुटकेचा निःश्वास घेतला असून, बाधित सापडण्‍याबरोबरच मृत्‍यूच्‍या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत चालले आहे.

आज जाहीर झालेल्‍या अहवालानुसार कऱ्हाड, खटाव, कोरेगाव तालुक्‍यांत प्रत्‍येकी ३, माणमध्‍ये ४, फलटणमध्‍ये सर्वाधिक ६, सातारा तालुक्‍यात २ बाधित सापडल्‍याची नोंद आहे. आजच्‍या अहवालानुसार जावळी, खंडाळा, महाबळेश्‍‍वर, पाटण, वाई या तालुक्‍यांत एकही बाधित सापडला नाही.

हेही वाचा: जळगाव : ‘एसडी सीड’ योजनेत अकरा लाखांचे योगदान

आज उपचारादरम्‍यान एकाही बाधिताचा मृत्‍यू झाला नसल्‍याचेही आरोग्‍य विभागाने दिलेल्‍या पत्रकात नमूद केले आहे. बाधित सापडण्‍याचे प्रमाण कमी होत. चालल्‍याने बाजारपेठा पूर्ववत आणि पूर्ण क्षमतेने सुरू होत असून, आगामी काळात जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू होण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनाचा प्रसार आणि फैलाव कमी होत असला, तरी आरोग्‍य यंत्रणा आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना आणि खबरदारी घेत असून, गाव, तसेच शहर पातळीवर घरोघरी जाऊन दस्‍तक योजनेच्‍या माध्‍यमातून नागरिकांना लस देत आहेत.

loading image
go to top