OBC activists stage dharna in Satara opposing Maratha reservation decision and Kunbi record inclusion.Sakal
सातारा
Maratha Reservation: 'ओबीसी संघटनेचे साताऱ्यात धरणे आंदोलन'; मराठा आरक्षणाच्या निर्णयाच्या निषेधात घोषणा; कुणबी नोंदींना विरोध
OBC rights agitation in Satara district 2025: ओबीसींच्या तुटपुंज्या २७ टक्के आरक्षणात पुढारलेल्या मराठा समाजाची घुसखोरी तातडीने थांबवावी, अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली. ओबीसींमधील घुसखोरीला आमचा ठाम विरोध आहे. केवळ विरोधामुळे सरकार मराठा समाजापुढे झुकत आहे.
सातारा: मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास विरोध असून, हा समाज खुल्या जागा आणि बोगस कुणबी नोंदीद्वारे आरक्षणाचा लाभ घेत आहे. हे बोगस दाखले रोखण्यासाठी जातीचे दाखले आधारकार्डला लिंक असावेत, तसेच शासनाने ओबीसींच्या सरकारी नोकऱ्यांतील अनुशेष तातडीने भरावा, भूमिहीनांना पडीक जमिनींचे वाटप करावे आदी मागण्यांसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.

