
Minister Jayakumar Gore
Sakal
बिजवडी: ओबीसी समाजबांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ओबीसी आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही, असे त्यांनी खात्रीने सांगितले असल्याने ओबीसी समाजबांधवांनी निश्चिंत राहावे. त्यामुळे सर्वांनी एकोप्याने राहून राज्याला प्रगतिपथावर नेण्यात योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.