स्वतः लिहिलेल्या कादंबऱ्यांचा हार अर्पण करुन डॉ. आंबेडकरांना अभिवादन; अभयकुमार देशमुख यांचा अनोखा उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेकडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन लेखक, पत्रकार अभयकुमार देशमुख यांनी स्वतः लिहिलेल्या कांदब-यांचा हार अर्पण करत अभिवादन केले. या अनोख्या अभिवादनाची चांगलीच चर्चा झाली.
ambedkar jayanti 2024
ambedkar jayanti 2024 Sakal

कऱ्हाड : डॉ. बाबासाहेब आंबेकडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन लेखक, पत्रकार अभयकुमार देशमुख यांनी स्वतः लिहिलेल्या कांदब-यांचा हार अर्पण करत अभिवादन केले. या अनोख्या अभिवादनाची चांगलीच चर्चा झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत आहेत. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच मोठी गर्दी होत होती. रात्री बारा वाजल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी शहरासह तालुक्यातील लोक उपस्थित राहत होते. तीच गर्दी सकाळीही दिसून आली.

येथील लेखक श्री. देशमुख यांनीही जयंतीचे औचित्य साधुन एक वेगळा उपक्रम राबवला. त्यांनी स्वतः लिहिलेल्या मुखिया, एल्गार, वी हेट बायोलॉजिकल वॉर, मसनवाट, व्यक्त अव्यक्त भाग १ या कादंबऱ्यांचा हार येथील बुधवार पेठेतील डॉ. आबेडकरांच्या पुतळ्यास अर्पन करुन अनोखे अभिवादन केलं.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती कऱ्हाडचे अध्यक्ष राहुल भोसले, माजी नगरसेवक आनंदराव लादे, समितीचे सदस्य, विठ्ठलराव देशमुख, विक्रमसिंह देशमुख व मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com