
आनेवाडी टोल नाक्यावर सतत वादावादी होत असते. शनिवारी सुटी घेऊन ड्युटीवर निघालेले अधिकारी पराडकर हे लेन क्रमांक आठमधून जात होते. गाडीला फास्ट टॅग होता; परंतु टोल व्यवस्थापनकडील मशिन ऍक्सेप्ट करत नसल्याने तेथील कर्मचारी हुज्जत घालू लागले.
भुईंज (जि. सातारा) : मंत्रालयात कार्यरत असलेले अतिरिक्त सचिव संतोष पराडकर हे कोल्हापूरहून मुंबईला निघाले असताना शनिवारी रात्री 12.20 च्या सुमारास आनेवाडी टोल नाका येथे फास्ट टॅग गाडीला असूनही टोलवरील फास्ट टॅग न चालल्याने दमदाटी करत कर्मचाऱ्याने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवूनही त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला. याबाबत त्या अधिकाऱ्याने रीतसर रस्ते प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे.
आनेवाडी टोल नाक्यावर सतत वादावादी होत असते. शनिवारी सुटी घेऊन ड्युटीवर निघालेले अधिकारी पराडकर हे लेन क्रमांक आठमधून जात होते. गाडीला फास्ट टॅग होता; परंतु टोल व्यवस्थापनकडील मशिन ऍक्सेप्ट करत नसल्याने तेथील कर्मचारी हुज्जत घालू लागले. पराडकर यांनी स्वतःचे ओळखपत्र दाखवले तरी दमदाटी केली.
तासवडेतील गुटखाप्रकरणी साताऱ्यातील दोघांना पोलिस कोठडी
त्यावरून वातावरण तणावपूर्ण झाले होते. पराडकर यांनी तक्रार केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे खंडाळा तालुकाप्रमुख आदेश जमदाडे यांनी आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर सामान्य व वाहनचालकांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचीही तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे