esakal | रेठऱ्यातील जुना पूल मे अखेरीस वाहतुकीस खुला : आमदार चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

रेठऱ्यातील जुना पूल मे अखेरीस वाहतुकीस खुला : आमदार चव्हाण

रेठऱ्यातील जुना पूल मे अखेरीस वाहतुकीस खुला : आमदार चव्हाण

sakal_logo
By
- अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (सातारा) : रेठरे बुद्रुकच्या कृष्णा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीसह नवीन पुलाच्या उभारणीस शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यासाठी ५१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. जुना पूल मे अखेरीस पूर्णतः दुरुस्त होऊन वाहतूक पूर्ववत होईल. नवीन पुलाचे दोन वर्षांत काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

रेठरे बुद्रुक गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीवर नवीन पूल व जुन्या पुलाची दुरुस्ती आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून होणार आहे. नवीन पुलासाठी जमीन धर तपासणीचे काम बांधकाम विभागाने नुकतेच सुरू केले आहे. या कामाची आमदार चव्हाण यांनी आज पाहणी केली.

हेही वाचा: "डिस्को, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?"; ठाकरेंना भाजपचा सवाल

कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव, उपअभियंता ए. जे. हुद्दार, शाखा अभियंता डी. एन. जाधव यांच्याकडून कामाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. या वेळी काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जयवंतराव ऊर्फ बंडानाना जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, जे. डी. मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, कृष्णत चव्हाण- पाटील, कऱ्हाड पंचायत समितीच्या माजी सभापती शोभाताई सुतार, दिग्विजय ऊर्फ आबा सूर्यवंशी, बिपीन ऊर्फ सनी मोहिते, धनंजय मोहिते, शरद पाटील, राम मोहिते, धनाजी शिंदे, देवदास माने, विनोद पाटील, महेश कणसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा: ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू; जाणून घ्या बुकिंग प्रोसेस

आमदार चव्हाण म्हणाले,‘‘ रेठऱ्यातील जुना पूल सहा कोटी रुपये खर्चून दुरुस्त होणार आहे. तो मे अखेरीस पूर्ववत होईल. नवीन पुलाचे मद्रास येथील आयटी तज्‍ज्ञांनी डिझाईन केले आहे. तो पूल उंच होऊन अद्ययावत होणार आहे. दोन वर्षांत ते काम पूर्ण होईल. त्यानंतर जुना व नवीन हे दोन्हीही पूल वाहतुकीस उपयुक्त ठरणार आहेत. त्यावर एकेरी वाहतूक होणार आहे.’’

loading image
go to top