esakal | ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू; जाणून घ्या बुकिंग प्रोसेस
sakal

बोलून बातमी शोधा

Ola Electric Scooter

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू; जाणून घ्या बुकिंग प्रोसेस

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Ola Electric Scooter : नुकतेच लॉंच झालेले ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आजपासून (सप्टेंबर 8) हे स्कूटर खरेदी करता येणार आहेत. तसेच ज्या ग्राहकांनी स्कूटर बुक केली आहे ते उर्वरित रक्कम भरून ती खरेदी देखील, तसेच स्कूटरचा रंग आणि प्रकार फायनल करु शकणार आहेत.

Ola कंपनीने गेल्या महिन्यात S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केले आहेत. या दोन्हा व्हेरियंटच्या किंमती या 99,999 रुपये आणि 1,29,999 रुपये अनुक्रमे (एक्स-शोरूम Fame II सह आणि सबसिडीज वगळून) आहे. दरम्यान कंपनीने ऑक्टोबरमध्ये या स्कूटरची डिलीव्हरी सुरू होईल अशी माहिती दिली आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर मिळवा घरपोच

1. जर तुम्ही आधीच प्री-बुकिंग किंमत भरली असेल, तर तुम्ही तुमचा फोन नंबर वापरून ओला इलेक्ट्रिक वेबसाइटवर लॉग इन करा आणि तुम्हाला खरेदी करायचे असलेले व्हेरिएंट निवडा. तुम्ही स्कूटरची बुकिंग केली नसल्यास, स्कूटरचे प्री-बुकिंग करण्यासाठी आपल्याला 499 ची टोकन रक्कम भरावी लागेल.

2. तुमचा आवडते स्कुटर प्रकार निवडल्यानंतर, तुम्हाला 10 उपलब्ध कलर व्हेरियंट पर्यायांमधून तुमचा आवडता कलर निवडावा. बुकिंग नंतर देखील तुम्ही निवडलेला पर्याय बदलण्याची ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे.

3. यानंतर तुम्हाला पेमेंट टॅब दिसेल. तुम्ही निवडलेल्या व्हेरियंटनुसार तुम्हाला तुमची शिल्लक रक्कम भरावी लागेल. तुम्हाला फायनान्स करण्याची इच्छा असल्यास ईएमआय पर्यायांमध्ये S1 स्कूटर्ससाठी ईएमआय 2,999 दरमहा पासून सुरु होतात. तर ओला एस 1 प्रोसाठी ईएमआय हा 3,199 पासून सुरू होईल.

हेही वाचा: 20 हजारात खेरेदी करा 'हे' दमदार 5G स्मार्टफोन्स, पाहा फीचर्स

4. ओला फायनान्शियल सर्व्हिसेसने ओला एस 1 साठी फायनान्स करण्यासाठी आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी आणि टाटा कॅपिटल या बँकांशी करार केला आहे. एचडीएफसी बँक पात्र ग्राहकांना ओला आणि ओला इलेक्ट्रिक अॅप्सवर काही मिनिटांत प्रि अप्रुव्हड लोन देण्यात येईल. असे कंपनीने म्हटले आहे की, टाटा कॅपिटल आणि आयडीएफसी फर्स्ट बँक डिजिटल केवायसीवर करेल आणि पात्र ग्राहकांना त्वरित कर्ज मंजुरी करेल.

याखेरीज तुम्ही थेट ओला S1 साठी 20,000 किंवा ओला S1 प्रो साठी 25,000 रुपय भरु शकता आणि उरलेली रक्कम स्कुटर मिळाल्यास भरावी लागणार आहे. डाउन-पेमेंट आणि अडव्हांस रक्कम ही पुर्णपणे रिफंडेबल आहे

5. खरेदीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर डिलिव्हरीची तारीख दिली जाईल. तसेच या ओला इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. ओला इलेक्ट्रिक तुम्हाला तुमचे स्कुटर कधी डिलीव्हर केले आणि तुमच्या आधी किती लोकांनी स्कुटर खरेदी केले आहे याबद्दल अपडेट करत राहील.

आपण ओला आणि ओला इलेक्ट्रिक अॅप्स वापरून ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा विमा देखील काढू शकता.

हेही वाचा: 1 नोव्हेंबरपासून 'या' स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्‌सअ‍ॅप होणार बंद

loading image
go to top