माजी मुख्यमंत्र्यांकडून 'सोलरसिटी'ला एक कोटी; गॅस सिलिंडरची होणार बचत

माजी मुख्यमंत्र्यांकडून 'सोलरसिटी'ला एक कोटी; गॅस सिलिंडरची होणार बचत

मलकापूर जि. सातारा) : शहरामध्ये सौरबंब व शासकीय इमारतीवर सोलर प्लॅनेट बसवल्यामुळे वीज आणि इंधनाची मोठी बचत होत आहे. शहरामध्ये दोन हजार 50 घरांत सौरबंबाचा वापर होत असल्यामुळे नागरिकांना इंधन बचतीला चांगलाच हातभार लागला आहे. अपारंपरिक ऊर्जा वापरातून वार्षिक नऊ हजारंवर गॅस सिलिंडरची बचत होत आहे. 

मलकापूर सोलरसिटी प्रकल्पाद्वारे शहरात जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करण्याचा प्रसार केला. प्रोत्साहन देण्यासाठी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये एक कोटी आठ लाखांचा निधी दिला होता. या निधीमधून तत्कालीन नगरपंचायतीने शासनाच्या अनुदानाच्या बरोबरीने सूट देत पहिल्या टप्प्यातच 700 च्यावर घरांवर सोलरबंब बसवले होते. तर त्यापूर्वीच काही वैयक्तिक मिळकतदारांनी सोलरबंबाचा वापर सुरू केला होता. या सर्वांच्या अपारंपरिक ऊर्जा वापराने झालेले फायदे विचारात घेता व शासनाचे अनुदान व पालिकेच्या प्रोत्साहन अनुदानाचा फायदा घेण्यासाठी शहरातील इतर मिळकदारांनीही आपल्या घरांवर सोलरबंब बसवले. 

2018 अखेर दोन हजार घरांवर सोलरबंबाचा वापर सुरू झाला. आजअखेर शहरात दोन हजार 50 घरांत सौरबंबाचा वापर होत असल्यामुळे इंधन बचतीला चांगलाच हातभार लागला आहे. मलकापूरवासीयांकडून झालेल्या अपारंपरिक ऊर्जा वापरामुळे वार्षिक नऊ हजारंवर गॅस सिलिंडरची बचत होत आहे. पाणी तापवण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत झाल्याने पर्यावरण संवर्धन होण्यास मदत झाली आहे. मलकापूर पालिकेने शासकीय इमारतींवर सोलर प्लॅनेट बसवले आहेत. त्याचा उपयोग इमारतींवरील विजेसाठी तसेच पथदिव्यांसाठी होत असून, त्यातूनही मोठी वीज बचत होत आहे. 

केंद्र शासनाने सोलरबंबाचे अचानक अनुदान बंद केले. तर निधीअभावी पालिकेचेही प्रोत्साहन अनुदान बंद झाले. त्यामुळे सोलरबंब बसवणारांची संख्या मंदावली. सर्वत्र सोलर उपकरणांचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अनुदान व पालिकेने प्रोत्साहन अनुदान सुरू केले, तर राज्यात आदर्श असे मलकापूर सोलरसिटी ठरेल.'' 
-जाकीर शिकलगार, सौरमित्र 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com