esakal | अवकाळी पावसाने तारळे, म्हसवडला झाेडपले; कुकुडवाड, साता-यात हलक्या सरी

बोलून बातमी शोधा

Rain
अवकाळी पावसाने तारळे, म्हसवडला झाेडपले; कुकुडवाड, साता-यात हलक्या सरी
sakal_logo
By
टीम सकाळ

सातारा : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजनूसार सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसास प्रारंभ झाला आहे. यामध्ये तारळे विभागात गारांसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. काशीळ परिसरात ढगाचा गडगडाट सुरु आहे. कुकुडवाड परिसरात हलक्या पावसास सुरवात झालेली आहे. म्हसवड परिसरात मेघ गर्जनेसह पावसास सुरवात झाली आहे.

राज्याच्या अनेक भागात 28 एप्रिलपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज (साेमवार) पुणे, सातारा , रायगड तसेच रत्नागिरी या भागात जाेरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागातील विशेषतः भाेर, शिरवळ, महाबळेश्वर, पाचगणी, वाई , सातारा यास महाड , चिपळुण या भागात पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसासह गारपीट हाेण्याची शक्यता वर्तवली आहे.

जनतेनं स्वत:च्या कुटुंबाप्रमाणं पोलिसांचीही काळजी घ्यावी; गृहराज्यमंत्र्यांची आर्त साद

दरम्यान आज तारळे विभागात गारांसह व विजांच्या कडकडाटसह पाऊस सुरू आहे. काशीळ परिसरात ढगाचा गडगडाट सुरु आहे. कुकुडवाड परिसरात हलक्या पाऊसास सुरवात झालेली आहे. म्हसवड परिसरात मेघ गर्जनेसह पावसास सुरवात झाली आहे. या पावसामुळे शेतक-यांची तारांबळ उडत आहे. उन्हाळी पिकांना पावसाचा फटका बसत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

रविवारी कराड तालुक्यास पावसाने झाेडपले

दरम्यान कराड तालुक्‍यातील विविध भागाला रविवारी दुपारनंतर वादळी पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात सुमारे दीड तास झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. आठवड्यापासून ढगाळ हवामान आणि ऊन यामुळे वातावरणातील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती. आज सकाळपासून त्यात आणखी भर पडली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरवात झाली. विजांच्या कडकडाटासह गारांचा वर्षाव झाला. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. सुमारे दीड तासाहून अधिक काळ झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. कऱ्हाड तालुक्‍यातील तांबवे, सुपने, किरपे, डेळेवाडी, गमेवाडी, पाठरवाडी या परिसरात जोरदार पाऊस झाला.

कऱ्हाड, वडगाव हवेली, उंडाळेत कोविड सेंटर करण्यावर शिक्कामोर्तब