Satara AccidentSakal
सातारा
Satara Accident: 'पारगाव- खंडाळा सेवा रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत एक ठार; दोघे गंभीर', दोन दुचाकींची समोरासमोर धडक
Fatal Bike Crash on Paragaon-Khandala Road: महामार्गावरील केसुर्डी व पारगावदरम्यानच्या सेवा रस्त्यावर भरधाव आलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले, तर रामनरेश यादव हे जागेवरच ठार झाले. ते जयभवानी हॉटेलमध्ये कर्मचारी होते.
खंडाळा : पारगाव- खंडाळा महामार्गावरील सेवा रस्त्यावर आज दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एक जण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.