Deposit Scheme : मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावे आता 'ठेवपावती' स्वरूपात ठेवता येणार रक्कम; काय आहे योजना?

दोन मुलींवर अपत्य नियोजन करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक लाभ मिळणार आहे.
Deposit Scheme
Deposit Schemeesakal
Summary

या योजनेमुळे पुरुष- स्त्री जन्मोतरमध्ये असणारी विषमता दूर होण्यास मदत होणार आहे.

खंडाळा : केसुर्डी (ता. खंडाळा) या ग्रामपंचायतीने (Kesurdi Gram Panchayat) ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले (Savitribai Phule) यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या बालिका दिनाचे औचित्य साधून गावात बालिका जन्माला आल्यास तिच्या नावे ठेवपावती स्वरूपात रक्कम ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला.

सरपंच सुरेखा ढमाळ, उपसरपंच सोनाली चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत हा ऐतिहासिक निर्णय झाला. यामध्ये प्रत्येक मुलीच्या जन्मावर तसेच केवळ एका मुलीवर अपत्य नियोजन करणाऱ्या तसेच दोन मुलींवर अपत्य नियोजन करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक लाभ मिळणार आहे.

Deposit Scheme
Post Office: पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना; 10 वर्षात तुमचे पैसे होतील दुप्पट, कसे ते जाणून घ्या

यामुळे पुरुष- स्त्री जन्मोतरमध्ये असणारी विषमता दूर होण्यास मदत होणार आहे. खंडाळा तालुक्यातील सावित्रीमाई फुले जन्मगाव नायगाव गावाच्या शिवेवर असलेल्या केसुर्डी गावातील ग्रामपंचायतीच्या या दिशादर्शक निर्णयाचे स्वागत होत आहे.

Deposit Scheme
गर्भवती महिलांसाठी भन्नाट योजना! प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून महिलांना आता मिळणार ६००० रुपये; पण, 'इथे' नोंदणी करावी लागणार

तीन जानेवारीपासून प्रारंभ

तीन जानेवारी २०२४ म्हणजे सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीपासून या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे; परंतु एक एप्रिल २०२४ या आर्थिक वर्षापासून लाभ देण्यास सुरुवात होणार आहे.

अशी आहे योजना

  • प्रत्येक पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये रकमेची ठेवपावती

  • एकाच मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे एक लाख रुपयाची ठेवपावती

  • दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे ५० हजार रुपये ठेवपावती

Deposit Scheme
Maratha Reservation : मराठा समाजाला घाबरूनच राज्यपालांचा 'तो' दौरा अचानक रद्द? नेमकं काय आहे प्रकरण

सावित्रीमाई फुले यांच्या कार्याची दखल घेत गावातील भविष्यात जन्म घेणाऱ्या मुलींविषयी हा निर्णय घेण्यात आला आहे.

-सुरेखा ढमाळ, सरपंच, केसुर्डी

महिलांचे सबलीकरण पाहता माझ्या गावातील महिला/ मुलीही सक्षम झाल्या पाहिजे. या निर्णयामुळे गावातील मुलींचा जन्मदर वाढणार आहे.

-सोनाली चव्हाण, उपसरपंच, केसुर्डी

एका चांगल्या निर्णयासाठी ग्रामस्थ एकत्र आले व ऐतिहासिक निर्णय घेतला, याचे समाधान आहे.

-धमेंद्र शिंदे, ग्रामसेवक, केसुर्डी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com