जाणून घ्या लाेणंद बाजार समितीमधील कांद्याचा भाव

जाणून घ्या लाेणंद बाजार समितीमधील कांद्याचा भाव

लोणंद (जि.सातारा) : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या कांद्याच्या बाजारात हळव्या व गरव्या कांद्याच्या दोन हजार 660 पिशव्यांची आवक झाली. लिलावादरम्यान गरव्या कांद्याचे भाव प्रती क्विंटलला 861 रुपयापर्यंत तेजीत निघाले, अशी माहिती लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.

लॉकडाउननंतर तीन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या लोणंदच्या कांदा बाजारात कांद्याचे भाव 900 ते एक हजार रुपयांपर्यंत निघत असले, तरी बाजारात कांद्याची म्हणावी तेवढी आवक होत नसल्याचे चित्र आहे. शेतकरी वर्ग कांद्याची चांगली भाववाढ होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने साठवणुकीचा कांदा म्हणावा तेवढा बाजारात विक्रीसाठी आणताना दिसत नाहीत. त्यामुळे आवकेवर त्याचा परिणाम दिसत आहे.

गुरुवारी प्रतवारीनुसार निघालेले कांद्याचे प्रतिक्विंटलचे भाव पुढीलप्रमाणे : कांदा नंबर एक- 650 ते 851 रुपये, कांदा नंबर दोन- 350 ते 650, तर गोल्टी कांदा- 100 ते 350 रुपयापर्यंत निघाले होते. भुसार मालाच्या बाजारात ज्वारी 3000 रुपये, बाजरी 2300 रुपये, गहू 2300 रुपये, तर मका 1800 रुपये प्रतिक्विंटलला भाव निघाले होते, तरी शेतकऱ्यांची आपला सर्व शेतीमाल चांगला वाळवून प्रतवारी करून बाजारात विक्रीसाठी आणण्याचे आवाहन सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले.

शेतकऱ्यांनी विरोध करू नये, माझे प्रयत्न तुमच्यासाठीच सुरु आहेत : शिवेंद्रसिंहराजे 

लोणंदच्या सत्तापटलावर आमदार मकरंद पाटील यांना स्‍थानिकांचा धक्‍का

राष्ट्रवादीची राष्ट्रवादीकडूनच धुळधाण... भाजपला अच्छे दिन

निवडणुका पुढे गेल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रशासक आणायचे कोठून? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com