esakal | धीर सोडू नका, आम्ही तुमच्या सोबत! साताऱ्यात 25 कुटुंबं कोरोना संकटातून सहीसलामत बाहेर

बोलून बातमी शोधा

Corona Virus
धीर सोडू नका, आम्ही तुमच्या सोबत! साताऱ्यात 25 कुटुंबं कोरोना संकटातून सहीसलामत बाहेर
sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोसळून पडणाऱ्या मनांना, कुटुंबीयांना आधार देण्याचे काम गेले काही दिवस शाहूपुरी अँटी कोरोना समन्वय समिती करत आहे. बाधितांसह त्याच्या निकटवर्तीयांचे समुपदेशन करत गरजेनुसार अन्नधान्य, औषधे समिती पुरवत आवश्‍यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहे. घाबरू नका... आम्ही सोबत आहोत, असा धीर देत या समितीने केलेल्या कामामुळे आजवर शाहूपुरी परिसरातील 25 कुटुंबिय कोरोनाच्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली आहेत.

गतवर्षी उडालेल्या कोरोनाच्या भडक्‍यात अनेक कुटुंबीयांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. कोरोना विषयीच्या सातत्यपूर्ण चर्चेमुळे समाजमन सैरभैर असून त्यातच निकटतर्वीय, परिसरातील काही बाधित झाल्याचे समजताच अस्वस्थेत वाढ होते. सैरभैर अवस्था, समाजातील अस्वस्थतेचा फटका बाधितांसह त्यांच्या कुटुंबीयांना बसतो. कोलमडलेल्या बाधिताच्या कुटुंबीयांना हादरवणारे वर्तन शेजाऱ्यांकडून घडू लागल्यानंतर तर खऱ्या अर्थाने परवड सुरू होते. बाधित, त्याच्या कुटुंबीयांची होणारी परवड लक्षात आल्यानंतर शाहूपुरी येथे अँटी कोरोना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.

Video पाहा : मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची! पालकमंत्र्यांची सून आरोग्य सेवेत

त्यात भारत भोसले, प्रा. डॉ. सुजित जाधव, राजेंद्र मोहिते, राजेंद्र केंडे, महेश जांभळे, संजय बारांगळे, विजय गार्डे, विकास देशमुख, सतीश सूर्यवंशी यांच्यासह सुमारे 70 जण सक्रिय आहेत. आपल्या भागात बाधित असल्याचे समजल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधत त्याचे समुपदेशन करण्यावर या समितीकडून भर देण्यात येतो. बाधित उपचारार्थ इतरत्र दाखल असेल आणि इतर घरात असतील तर त्यांना लागणारे साहित्य, औषधे, वैद्यकीय सेवा, धान्न, जेवणही पुरविण्यावर समितीचा भर असतो. हे करतानाच बाधिताच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांचे आत्मबल वाढविण्यासाठीचे प्रेरक उपक्रम सोशल मीडियाव्दारे राबविण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांत या समितीच्या सातत्यपूर्ण कामामुळे शाहूपुरी परिसरातील सुमारे 25 कुटुंबिय कोरोनाच्या विळख्यातून सहीसलामत बाहेर पडली आहेत.

'मला कोरोना झाला अन् तब्बल चार तास माझे पती बेडसाठी वणवण हिंडत राहिले'

तीन पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन

या समितीकडे तीन पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन असून ती आवश्‍यकतेनुसार गरजूंना पुरविण्यात येत आहेत. त्यापैकी दोन मशिन भारत भोसले यांच्या कुटुंबीयांनी दिली असून एक मशिन शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या सदस्यांनी स्वत: खरेदी केली आहेत.

Edited By : Balkrishna Madhale