esakal | मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची! पालकमंत्र्यांची सून आरोग्य सेवेत

बोलून बातमी शोधा

Tejaswi Patil
मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची! पालकमंत्र्यांची सून आरोग्य सेवेत
sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड : शहरातील कोविडची स्थिती वाढत आहे. शहरात पाच ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात हाेती. एका ठिकाणी पालिकेने टेस्टिंग सुरू केले आहे. पालिकेला दहा डॉक्‍टरांची गरज असताना पालिकेने केलेल्या आवाहनानुसार प्रत्यक्षात केवळ दोनच डॉक्‍टर पालिकेच्या मदतीला पुढे आले आहेत. त्यामुळे अद्यापही आठ डॉक्‍टरांची गरज आहे. शहरातील डॉक्‍टरांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.

शहरात कोविडची स्थिती भयंकर होत असतानाच पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्या पत्नी डॉ. तेजस्वी यांनी कोविड काळात काम करण्याची तयारी दाखवत कोणताही गाजावाजा न करता थेट रुग्णसेवा सुरू केली. लसीकरणाच्या मोहिमेवर प्रत्यक्ष कार्यरतही आहेत. पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात त्या लसीकरण विभाग सांभाळात आहेत.

डॉ. सौ. पाटील या पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या चुलत स्नुषा, तर ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांच्या नातसून आहेत. कोणतेही मानधन न घेता काम सुरू केले आहे. त्यांच्यासह दोन दिवसांपासून डॉ. दिलीप सोलंकी यांनीही पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामास सुरवात केली आहे. पालिकेला दहा डॉक्‍टरांची गरज आहे. शहरात कोविडचे ऍक्‍टिव्ह सुमारे 240 रुग्ण आहेत. त्यात सुमारे 100 रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत. त्यांना सेवेसाठी डॉक्‍टरांची गरज आहे. त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले मानधनही देण्यात येणार आहे.

शहरात लसीकरणाची क्षमता वाढविणार आहे. एक हजारापर्यंत नेण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी लस व टेस्ट करण्याचे किट उपलब्ध होत नाहीत. ती उपलब्ध झाल्यास तीही सुविधा देण्यात येईल, त्यासाठी डॉक्‍टरांची गरज आहे. याबराेबरच शहरात होमआयसोलेशनमधील रुग्णांना सेवा देण्यासाठी विशेष करून डॉक्‍टरांच्या पथकाचीही गरज आहे. त्यामुळे इच्छुकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी डाके यांनी केले आहे.

कोरेगाव, फलटण, खंडाळा, खटाव हॉट्‌स्पॉट; कऱ्हाडात 9 मृत्यू

झाला निर्णय;18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी माेजावे लागणार पैसे

चर्चा तर हाेणारच; भागवत कुटुंबियांनी घातले 'स्टेला'चे डाेहाळ जेवण

Edited By : Siddharth Latkar