
Satara district celebrates its top position in micro food processing industry, showcasing approved projects and growing industrial initiatives.
Sakal
सातारा : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत शासनाकडून ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे. जिल्ह्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार १२ प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे योजनेत निर्धारित उद्दिष्टानुसार जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले आहे.