

Satara Police Strengthen Security for Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Yatra
sakal
-रमेश धायगुडे/मनोज पवार
लोणंद : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी (ता. १५) जिल्ह्यात आगमन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करून यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटणचे पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नियंत्रणाखाली बंदोबस्ताची व्यवस्था केली असल्याची माहिती लोणंदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी दिली.