
-उमेश बांबरे
सातारा : अतिवृष्टीत नुकसानीच्या भरपाईत शासनाने बदल केल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल पुन्हा नव्या दराने करण्यात आला आहे. याचा फटका बाधित शेतकऱ्यांना बसणार असून, त्यांना मिळणारी भरपाईची रक्कम कमी होणार आहे. नवीन दराने १२ कोटींची नुकसानीची रक्कम सात कोटी ९१ लाखांवर आली आहे. त्यामुळे १४ हजारांवर शेतकऱ्यांना या भरपाईत आर्थिक फटका बसला आहे.