बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना तराळ यांनी व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून ऑक्सिजन मशिन खरेदीसाठी स्वच्छेने लोकवर्गणी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील युवा ग्रामस्थ मंडळाने एक मशिन उपलब्ध करून दिले, तर सचिन जगदाळे यांनी देखील लक्ष्मी मेडिकलमार्फत पोर्टेबल ऑक्सिजन मशिन खरेदी करून आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केली.
बावधनकरांना मिळणार मोफत 'ऑक्सिजन'
वाई (जि. सातारा) : बावधन गावाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरी पूर्ण केल्याने अनेकांना व्हेंटिलेटर, बेडअभावी मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. याचा विचार करून, सामाजिक भान जपत बावधन येथील लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे संचालक सचिन जगदाळे, तसेच युवा ग्रामस्थ मंडळ यांनी पोर्टेबल ऑक्सिजन मशिन खरेदी केल्याने आता गरजूंना मोफत श्वास मिळणार आहे.
बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना तराळ यांनी व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून ऑक्सिजन मशिन खरेदीसाठी स्वच्छेने लोकवर्गणी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील युवा ग्रामस्थ मंडळाने एक मशिन उपलब्ध करून दिले, तर सचिन जगदाळे यांनी देखील लक्ष्मी मेडिकलमार्फत पोर्टेबल ऑक्सिजन मशिन खरेदी करून आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केली.
आदर्शवत! बहिणीच्या स्मरणार्थ रुग्णांना मोफत श्वास
या वेळी शशिकांत पिसाळ, वसंतराव पिसाळ, दिलीपराव पिसाळ, शारदा ननावरे, राजेंद्र कदम, अंकुश कुंभार, अजित पाटील, राजू भोसले, पप्पूराजे भोसले, तानाजी कचरे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केले. यामुळे स्थानिक गरजूंना व आजारी व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. या वेळी दिलीप पिसाळ यांनी सचिन जगदाळे आणि युवा ग्रामस्थ मंडळाचे कौतुक केले. डॉ. तराळ यांनी बावधनकरांच्या या उपक्रमाचे कौतुक करून अशाच एकजुटीने कोरोनाचा सामना करून हरवूयात, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सचिन जगदाळे आणि युवा ग्रामस्थ मंडळाचा सत्कार करण्यात आला. या वेळी सदाशिव ननावरे, अमोल जाधव, राजेंद्र भोसले, राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Web Title: Oxygen Machine Health Center Bawadhan Satara News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..