कऱ्हाड - सातारा जिल्ह्यातील आम्ही सात जण सध्या श्रीनगरमधील हॉटेलमध्ये मुक्कामी असून, सुखरूप आहोत. आम्ही श्रीनगरमधुन मुंबई किंवा पुण्याला येण्यासाठी विमानाच्या तिकिटाची प्रतिक्षा करत आहोत. मात्र, येथून तिकीट मिळेल की नाही हे कोणीच सांगत नाही..आम्हाला तर येथून बाहेर पडायचे आहे. आमदारांशी माझे बोलणे झाले. त्यांनी सरकारकडून काही उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे शासनाच्या मदतीची वाट पाहतोय, असे श्रीनगरमध्ये अडकलेल्या कऱ्हाड येथील महेश कुलकर्णी यांनी दै. ‘सकाळ’शी बोलताना सांगितले..जिल्ह्यातून कऱ्हाडचे इंटिरिअर डिझायनर असलेले महेश कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, श्रीधर क्षीरसागर, वर्षा क्षीरसागर, सुखदा क्षीरसागर, तर साताऱ्याचे शरद पवार, विद्या पवार हे पर्यटनासाठी जम्मू -काश्मीरला गेले आहेत. तेथील परिस्थिची माहिती देताना महेश कुलकर्णी म्हणाले, ‘आम्ही श्रीनगरमध्ये असताना पहलगाम येथे गोळीबार झाला असून, तेथे काहीजण ठार झाल्याची माहिती मिळाली..त्यांना तेथील प्रवासी वाहतुकीच्या टॅक्सी चालकांनीही त्याची माहिती दिली. त्यामुळे आम्ही घाबरलो. तातडीने आम्ही श्रीनगरमधील ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या हॉटेलमध्ये धाव घेतली. दरम्यान, आमच्या हॉटेलमध्ये जे सैन्यदलाचे अधिकारी मुक्कामास होते. त्या पहलगामधील हल्यात ठार झाल्याची माहिती आम्हाला हॉटेलमध्ये मिळाली. त्यामुळे आमच्या चिंतेत भर पडली..राज्यातील ५० ते ६० जण त्या हॉटेलमध्ये होते. त्यानंतर नातेवाइकांना फोन करून आम्ही व्यवस्थित असल्याचे सांगितले. मात्र, तरीही सारखे फोन आम्हाला येतच आहेत. आज आम्ही पहलगामला जाणार होतो. मात्र, तेथे अशी परिस्थिती झाल्यामुळे आम्ही सर्वजण हॉटेलमध्येच आहोत. सध्या श्रीनगर, जम्मू-काश्मीर परिसरात सैन्यदलाची गस्त वाढवण्यात आली आहे..त्या परिसरातील दुकाने- मॉल बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर सैन्यदलाचे चेकपॉईंटही वाढवण्यात आले आहेत. प्रवासी वाहतुकीच्या वाहनधारकांनीही पर्यटकांना फिरण्यासाठी नेणे बंद केले आहे. काही ठिकाणच्या विमान सेवा, रेल्वे सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. आम्ही सात जण सध्या श्रीनगरमधील हॉटेलमध्ये मुक्कामी आहोत.’.दैव बलवत्तर म्हणून हेळगावकर बचावलेदहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यापासून केवळ एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील हेळगावमधील १७ पर्यटक सुखरूप असल्याचे थेट काश्मीरमधून भरत सूर्यवंशी आणि अमोल पवार यांनी दूरध्वनीवरून सांगितले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो. मात्र, पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.