पाचगणीत हनी ट्रॅप; पिंपरी चिंचवडच्या युवतीसह चाैघांना अटक

रविकांत बेलोशे
Thursday, 31 December 2020

दरम्यानच्या कालावधीत तिघांनी शार्दुलच्या वडिलांनाही एक लाख रूपयांची खंडणी मागणी केली होती. यावरून शार्दुल याने पाचगणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पाचगणी पोलिसांनी लागलीच प्रिया जाधव हिच्यासह अन्य तिघांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरिक्षक सतीश पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार कदम व त्यांचे सहकारी करीत आहेत.

भिलार (जि. सातारा) : पाचगणी पोलिस ठाण्यात हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तातडीने तपास करून यातील एक महिला व तीन युवक आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की शार्दुल मोहन खलाटे (वय 22 वर्षे) रा बिरदेव नगर फलटण (जि. सातारा) याने याबाबत पांचगणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

बुधवारी शार्दुल फिर्यादी याला प्रिया जाधव उर्फ स्वाती जाधव मूळ (रा. रावेत वाल्हेकरवाडी, पिंपरी चिंचवड, सध्या रा. फलटण) हिने व्हाट्सअप कॉलवरुन दुपारी 1:45 वाजता सुमारास फोन करून आपण महाबळेश्वर येथे जावू असे सांगितलेने फिर्यादी यांनी त्याच्या गाडीत तिला घेऊन महाबळेश्वर येथे जात असताना तिने पाचगणी येथील हॉटेल रिव्हर पॅलेस येथे थांबू असे सांगितल्याने ते दोघे तेथे त्यांच्या जवळील ओळखपत्र जमा करून साधरणतः तासभर थांबून सदर हॉटेलच्या बाहेर आले असता पार्किंगमध्ये शार्दुल याला मारुती दिलीप शेलार, अमोल भीमा यमपुरे, सुरज शिवाजी देवकर (सर्व रा. फलटण) यांनी हाताने मारहाण करून, शिवीगाळ दमदाटी करून तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवितो असे सांगून एक लाख रुपयांची खंडणीची मागणी केली व तु आम्हाला पैसे देत नसशील तर तुला पोलिस स्टेशनला अडकवतो असे सांगून दमदाटी केली तसेच फिर्यादी सोबत असणारी प्रिया जाधव उर्फ स्वाती जाधव हिने देखील फिर्यादीला सांगितले की तू त्यांना पैसे दे नाहीतर तुला मी खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविन.

७० वर्षांच्या दोन आजीबाईंनी भरला ग्रामपंचायत फॉर्म ; मी निवडून येणार हाय म्हणत केली भल्याभल्यांची बोलती बंद  

दरम्यानच्या कालावधीत तिघांनी शार्दुलच्या वडिलांनाही एक लाख रूपयांची खंडणी मागणी केली होती. यावरून शार्दुल याने पाचगणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पाचगणी पोलिसांनी लागलीच प्रिया जाधव हिच्यासह अन्य तिघांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरिक्षक सतीश पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार कदम व त्यांचे सहकारी करीत आहेत.

टेम्पो पलटी, कोंबड्यांची कलटी; ग्रामस्थांनी पळविल्या मेलेल्या काेंबड्या

Edited By : Siddharth Latkar

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchgani Police Arrested Young Girl Of Pimpri Chinchwad Satara Crime News