

Panchgani Police team with the recovered bikes; thief arrested within 24 hours of the complaint.
Sakal
भिलार: पाचगणी पोलिसांनी दुचाकी चोरट्याला मुद्देमालासह २४ तासांत अटक केली. त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरलेल्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विवेक विठोबा मोरे (वय १९, रा. गोडवली, ता. महाबळेश्वर, मूळगाव रा. करंजे, ता. पोलादपूर, जि. रायगड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.