

Political buzz in Panchgani as BJP decides to contest independently; NCP adopts a cautious stand.
sakal
भोसे : पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या रंग भरू लागले आहेत. उमेदवार कुठल्या आघाडीचा, पक्षाचा, नेत्याचा या चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, पाचगणीत आज राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी तळ ठोकून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यात भाजपने स्वबळावर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादी पक्षाने मात्र ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.