

Krishna Candidature Sparks Political Tension; Alliances Work to Prevent Revolt
sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड: रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रणधुमाळीचा पारा ऐन उन्हाळ्यात तापला आहे. अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी दोनच दिवसांचा अवधी राहिला आहे. इतक्या कमी दिवसांत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि विरोधक संस्थापक पॅनेल यांच्या छावणीत मात्र अद्यापही उमेदवारांची नावे निश्चित करताना दमछाक होताना दिसत आहे.