
Taradgaon farmer’s papaya farming success – earns 12 lakh annually from 48 gunthas, sells in Pune market.
Sakal
-अशोक सस्ते
आसू: शेती उत्पादनासाठी बाजारपेठ महत्त्वाची असून, कोणी स्थानिक, तर कोणी ऑनलाइन बाजारपेठ शोधतात; पण तरडगाव (ता. फलटण) येथील अमोल काकडे या प्रयोगशील शेतकऱ्याने पपईसाठी पुणे येथील बाजारपेठेची वाट शोधली आणि मोठ्या धाडसाने ते यशस्वी झाले आहेत. त्यांनी आपल्या ४८ गुंठे क्षेत्रातील पपईतून १२ लाखांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्या या प्रयोगाचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.