

Parents gather at Krishna Hospital after school bus accident; injured students reported stable.
Sakal
कऱ्हाड : कोल्हापूर- पुणे महामार्गावरील वाठार (ता. कऱ्हाड) गावाजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सहलीची बस पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात २० फूट खाली पडून काल पहाटे अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी येथील कृष्णा रुग्णालयात धाव घेतली आहे.