esakal | पाटणला रिक्त पदांमुळे रखडल्या मोजण्या; हजारांवर प्रकरणे प्रलंबित
sakal

बोलून बातमी शोधा

office

मोजणीची एक हजारांवर प्रकरणे रिक्त पदांमुळे प्रलंबित राहिली आहेत.

पाटणला रिक्त पदांमुळे रखडल्या मोजण्या; हजारांवर प्रकरणे प्रलंबित

sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (सातारा): भूमिअभिलेख कार्यालयातील २५ ऑगस्‍ट २०१६ पासून पाच वर्षे रिक्त असणारे उपअधीक्षकपद शासनाने नुकतेच भरले आहे. मात्र, भूमिअभिलेख कार्यालयातील मंजूर आस्थापनातील २२ पदांपैकी सात पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. मोजणीची एक हजारांवर प्रकरणे रिक्त पदांमुळे प्रलंबित राहिली आहेत.

हेही वाचा: पाटण पंचायत समितीचे काम अभिमानास्पद : गृहराज्यमंत्री देसाई

पाटण तालुक्यात मूळ २०५ व वाडीविभाजन झालेली १३८ गावे आहेत. एकत्रिकरण पूर्ण झालेली १२६ गावे व नगरभूमापन योजना लागू असणारी २४ गावे आहेत. एकत्रिकरण केलेल्या गावांची संख्या ७९ असली तरी १९९२ पासून या योजनेला स्थगिती असल्याने एकत्रिकरणाची कामे प्रलंबित आहेत. पाटण तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र दोन लाख ५५ हजार १५ हेक्टर असून, कामाचा भार सांभाळण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडे कागदोपत्री २२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी भूकरमापक, छाननी लिपिक, कनिष्ठ लिपिक, अभिलेखपाल, दप्तरबंद ही पाच पदे व शिपाई दोन अशी सात पदे रिक्त आहेत. कार्यालयप्रमुख अर्थात उपअधीक्षक हे पद २५ ऑगस्ट‍ २०१६ पासून गेली पाच वर्षे रिक्त होते. ते नुकतेच भरले आहे. नगरभूमापन योजना लागू झालेली २४ गावे आहेत.

हेही वाचा: घरकुलच्या ‘पाटण पॅटर्न’ला पुरस्कार! तीन वर्षांत अडीच हजारांवर घरकुले

यासाठी स्वतंत्र कार्यालय असते. मात्र, या कार्यालयाचा भारही कार्यरत कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. रिक्त पदांमुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होत नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पवनऊर्जा प्रकल्प व गावागावांतील राजकीय व भावाभावांतील हद्दीच्या वादामुळे मोजणी प्रकरणांची संख्या वाढत आहे. स्कीम, मिळकत पत्रिका, चौकशी नोंद, टिपण, आकारबंद, कमी-जास्त पत्रक, कब्जेदार यादी, कब्जापावती व जबाब उतारा नक्कल याचबरोबर मोजणी, गट व सर्व्हेनंबर नकाशा नक्कल ही कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्यांना दिवस-दिवस कर्मचारी नसल्याने बसावे लागते. यासाठी महिनाभर हेलपाटेही मारावे लागतात.

हेही वाचा: पाटण तालुक्यातील 10 गावे धोकादायकच! भूगर्भ तज्ञांची पाहणी...

तातडीच्या मोजणीलाही दीड वर्ष

साधी मोजणीस एक हजार, तातडीची मोजणीस दोन हजार, अति तातडीची तीन हजार व अति-अतितातडी मोजणीस १२ हजार असे मोजणीचे चार प्रकार व मोजणी शुल्क आहे. रिक्त पदांमुळे साधी मोजणीला तीन वर्षे, तातडीच्या मोजणीला अडीच वर्षे, अतितातडीला दीड वर्षाहून काळ लागत आहे. अति-अतितातडीची मोजणी दोन महिन्यांच्या आत होते. मात्र, जनतेला जादा पैसे मोजावे लागतात. याचा विचार शासन दरबारी होणे गरजेचे आहे.

loading image
go to top