शिवसेनेच्या चार उमेदवारांचे अर्ज अवैध; राष्ट्रवादीमुळं रंगत वाढणार

Shivsena
Shivsenaesakal
Summary

शिवसेनेनं 16, भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी सहा असे एकूण 28 उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म देऊन पक्षाची अधिकृत उमेदवारी दिलीय.

पाटण (सातारा) : नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Patan Nagar Panchayat Election) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत चार उमेदवारी अर्ज सूचक कमी व शिवसेनेचे (Shiv Sena) एबी फॉर्म (AB form) नसल्याने अवैध झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुनील गाढे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली. शिवसेना, भाजप (BJP) व काँग्रेसने (Congress Party) अधिकृत उमेदवार दिले असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) अधिकृत उमेदवार दिलेले नाहीत.

पाटणच्या प्रभाग क्रमांक १७ मधील शफी रमजान सातारकर व पंकज यशवंत नाईकवडी यांनी, तर प्रभाग १४ मध्ये रेश्मा इब्राहिम सातारकर आणि प्रभाग ११ मधील गणेश देवकांत यांनी शिवसेनाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, पक्षाचे ‘एबी’ फॉर्म न मिळाल्याने या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. प्रभाग क्रमांक नऊमधील अनुसूचित जमाती राखीव प्रभागातील संतोष शंकर पवार यांच्या उमेदवारीवर तीन अपत्ये आहेत, असा आक्षेप घेतला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी तो फेटाळला गेला. या निवडणुकीसाठी एकूण १४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र, ओबीसी आरक्षणातील चार प्रभागांमध्ये २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यांची छाननी करण्यात आली नाही. त्यामुळे ११५ उमेदवारी अर्जांची छाननी झाली. चार उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, १३ प्रभागांत १११ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.

Shivsena
Political News : खासदार उदयनराजे भाजपलाही नकोसे?

राष्ट्रवादीमुळे निवडणुकीत रंगत वाढणार

शिवसेनेने १६, भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी सहा असे एकूण २८ उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म देऊन पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

Shivsena
'आमदार शिंदेंना थंड करुन घरी बसवण्याची ताकत आमच्यात'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com