

Shashikant Shinde
Sakal
सातारारोड: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज आमदार शशिकांत शिंदे यांनी पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडला आणि खळबळ उडवून दिली, ‘तुम्हाला दोन नंबरचे धंदे करायचे आहेत ते करा, मुक्तपणे करा’, अशा प्रकारच्या कोरेगाव पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या अवैध व्यावसायिकासोबतच्या संभाषणाच्या क्लिपचा पेन ड्राइव्ह मी आपल्याला देतो, असे म्हणत या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांना द्यावेत, अशी मागणी आमदार शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे केली.