
ढेबेवाडी: पुनर्वसित गावठाण तयार करून त्यातील नागरी सुविधांची कामे पूर्णत्वाकडे आहेत. मात्र, मराठवाडी धरणाच्या काठावरील मेंढ गावठाणातील काही धरणग्रस्त कुटुंबांना सहा वर्षे उलटूनही अद्याप घर बांधण्यासाठी भूखंडच मिळालेले नाहीत. निवारा शेडमध्ये परिस्थितीशी दोन हात करत ही कुटुंबे राहात आहेत. तातडीने त्यांना भूखंड वाटप करून हाल थांबवा, अन्यथा धरणात जलसमाधी घेऊ, असा इशारा धरणग्रस्त कृती समितीने आज दिला.