
-मनोज पवार
दुधेबावी : ऊन, वारा व पाऊस यांची किंचितही तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने निघालेला श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने फलटणकरांच्या सेवेने तृप्त होऊन प्रस्थान केले. सायंकाळी बरड येथील पालखी तळावर हा सोहळा मुक्कामासाठी विसावला. उद्या (सोमवार) हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.