

Minister Jaykumar Gore addressing the media during a political interaction in Phaltan.
Sakal
फलटण : तुम्ही शहरासाठी ३५ वर्षे काय काम केले? यावर प्रचारात बोलले पाहिजे; परंतु विरोधकांकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. डॉक्टर युवतीच्या आत्महत्येशी त्यांचा संबंध नसतानाही त्याचे भांडवल केले जात आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर असलेल्या शहराला देशात बदनाम करण्याचं काम सुरू आहे. फलटण शहर म्हणजे कोणाचा सातबारा नाही, असा आरोप ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केला.