
"Stone pelting at Jinti Naka in Phaltan; 13 arrested after clash between two mandals."
Sakal
फलटण: शहरातील जिंती नाका परिसरात शनिवारी दुपारी दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासमोरच एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.