Satara Doctor Case: 'गाेपाल बदने, प्रशांत बनकरच्या पोलिस कोठडीत वाढ'; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायालयात नेमकं काय घडलं?
Phaltan Doctor Death Case: याप्रकरणी डॉक्टरच्या भावाच्या फिर्यादीवरून उपनिरीक्षक बदने व प्रशांत बनकर यांच्यावर अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
फलटण : डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील संशयित, निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने व ज्या ठिकाणी पीडित राहात होती, त्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर या दोघांनाही आज न्यायालयाने दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली.