माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Phaltan fire incident: घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रासायनिक पदार्थांमुळे आग आटोक्यात आणणे कठीण जात होते, त्यामुळे अनेक तासांनंतरच आगीवर नियंत्रण मिळवता आले.
Phaltan fire incident

Firefighters battle a massive blaze after two chemical companies in Phaltan caught fire

Sakal

Updated on

लोणंद : कोरेगाव (ता. फलटण) येथे मॅग्नेशिया केमिकल कंपनी व अरिस्टा केमिकल कंपनीला आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीत एक कंटेनर, एक टेंपो व अन्य साहित्य जळून खाक होऊन सुमारे सव्वाआठ कोटी रुपयांचे नुकसान झाले. लोणंद पोलिसांनी विविध ठिकाणचे अग्निशामक दलांना पाचारण करून आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com