
“Raghunathraje Naik-Nimbalkar announces Shiv Bhojan Yojana under Phaltan Market Committee to support farmers.”
Sakal
फलटण: फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी उभे राहणार असल्याचे मत फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा भोसले, फलटण तालुका दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार व संचालक उपस्थित होते.