सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचा राजीनामा; रिक्त पदांवर कुणाची लागणार वर्णी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivarupraje Khardekar

सभापतीपदासाठी विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचा राजीनामा

फलटण शहर (सातारा) : फलटण पंचायत समितीचे (Phaltan Panchayat Committee) सभापती शिवरूपराजे खर्डेकर (Speaker Shivarupraje Khardekar) व उपसभापती रेखा खरात यांनी पदाचे राजीनामे दिले असून रिक्त पदांवर आता कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुक्ता तालुक्यात लागून राहिलीय.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara Bank) संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवरूपराजे खर्डेकर यांनी फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे दिला आहे, तर फलटण पंचायत समितीच्या उपसभापती रेखा खरात यांनीही आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडे दिला आहे.

हेही वाचा: नाकाबंदी भेदत राजेंची जिल्हा बॅंकेत दमदार एन्ट्री

हे राजिनामे मंजूर झाल्यानंतर सभापतीपदासाठी विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर हे सभापतीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत, तर उपसभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबतचीही उत्सुक्ता लागून राहिलीय. अगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर येवून ठेपल्याने सभापती व उपसभापतीपदाच्या निवडींना महत्व प्राप्त होणार आहे.

हेही वाचा: बॅंक निवडणुकीसाठी NCP चे 'सहकार पॅनेल' रिंगणात

loading image
go to top