'गण गण गणात बोते'च्या जयघाेषात फलटण-शेगाव बससेवा सुरू

किरण बाेळे
Friday, 18 December 2020

प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण शहर (जि. सातारा) : शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जाण्यासाठी फलटण आगारातून फलटण-शेगाव बससेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे. भाविकांसह प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले आहे.
 
ही बस फलटणहून सकाळी सात वाजता सुटून शेगाव येथे रात्री साडेआठला पोचणार आहे. शेगाववरून सकाळी सात वाजता सुटून ती फलटणला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पोचेल. ही बस बारामती, कर्जत, जामखेड, बीड, जालना, चिखली, खामगावमार्गे शेगावला जाईल.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जावळीच्या अर्थकारणाला कृषी पर्यटन केंद्रांमुळे चालना

आदर्शवत! आईची स्मृती जपण्यासाठी रक्षा विखुरल्या शेतात; साताऱ्यातील मेढ्यात पर्यावरण रक्षणासाठी अनोखे पाऊल
 
दरम्यान, फलटण आगारातून आसू, होळ, शिंगणापूर, लोणंद, मुंजवडी, वाघोशी, वडूज, शिंदेनगर, झडकबाईचीवाडी या तालुक्‍यांतील मुक्कामी बसही सुरू करण्यात आल्या आहेत. गिरवी, लोणंद, पुसेगाव, बोडकेवाडी, ताथवडा, वडूज, तरडफ, राजाळे, आसू, शिंगणापूर या फेऱ्याही सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवासांनी बससेवेचा लाभ घ्यावा व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Phaltan Shegoan Bus Service Begins Trending News Satara News