

Phaltan Doctor Found Dead Letter Reveals Police Tried to Influence Report
esakal
साताऱ्यात महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आत्महत्येआधी हातावर आणि चार पानी पत्रात महिला डॉक्टरनं अनेक गंभीर आरोप केले आहेत. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीच्या तपासणीसाठी तसंच पीडितांच्या शवविच्छेदनाचे अहवाल हवे तसे देण्यासाठी पोलीस आणि लोकप्रतिनिधींचा दबाव असायचा असं त्यात म्हटलंय. लोकप्रतिनिधी, त्यांचे दोन पीए आणि पोलीस यांच्याकडून छळ केला जात असल्याचे आरोप महिलेनं पत्रात लिहिलेत. आत्महत्येआधी हातावर पोलीस उपनिरीक्षक आणि घरमालकाच्या मुलाचं नाव महिला डॉक्टरनं लिहिलं होतं. पीएसआय आणि घरमालकाच्या मुलानं शारीरिक आणि मानसिक छळ करत अत्याचार केल्याचं तिने लिहिलंय.या प्रकरणी पीएसआय गोपाल बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.