esakal | Don't Worry! महाबळेश्वरला चार महिने पुरेल एवढा पाणीसाठी, वेण्णा धरणात मुबलक पाणी

बोलून बातमी शोधा

Mahabaleshwar
Don't Worry! महाबळेश्वरला चार महिने पुरेल एवढा पाणीसाठी, वेण्णा धरणात मुबलक पाणी
sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : "पाऊस काही दिवस लांबला तरी महाबळेश्वर शहरास पाणी कमी पडणार नाही, एवढा पाणीसाठा सध्या वेण्णा धरणात उपलब्ध आहे. सध्या लॉकडाउनची स्थिती आहे. परिणामी, शहरामध्ये पर्यटकांची आवक कमी आहे. परंतु, अनलॉक जाहीर झाला आणि उन्हाळी हंगाम भरला तरी, महाबळेश्वर शहरास चार महिने पुरेल एवढा पाणीसाठी धरणात उपलब्ध आहे,'' अशी माहिती महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.

आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या मुख्याधिकारी पाटील यांनी नुकतीच येथील वेण्णा धरणाला भेट देऊन तेथील पिण्यायोग्य असलेल्या पाण्याच्या साठ्याची पाहणी केली. या वेळी पालिकेतील कर विभागाच्या कर निरीक्षक भक्ती जाधव उपस्थित होत्या. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ प्रसिध्द आहे. येथे दरवर्षी साधारण 18 ते 20 लाख पर्यटक भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेतात.

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..

पर्यटकांच्या या वाढत्या संख्येमुळे महाबळेश्वर शहरास मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या पालिकेवर कायम अतिरिक्त ताण येतो. परंतु, वेण्णा धरणामुळे महाबळेश्वर शहरास पाणीटंचाईची झळ बसत नाही. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून मुख्याधिकरी पाटील यांनी वेण्णा धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला. वेण्णा धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, कोविडच्या कामाच्या व्यापातूनही वेळातवेळ काढून मुख्याधिकारी पाटील यांनी वेण्णा धरणास भेट देऊन पाणीसाठ्याचा आढावा घेतल्याने मुख्याधिकाऱ्यांचे शहरातून कौतुक केले जात आहे.

Edited By : Balkrishna Madhale