
दहिवडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घरकुलाची उभारणी करत आहेत. याचा मोठा लाभ माण तालुक्यातील आंधळी गावाला झाला आहे. त्यामुळे या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सरपंच दादासाहेब काळे यांनी प्रत्येक घरकुलावरती या तिघांचे छायाचित्र छापण्याचा संकल्प केला असून, त्याची सुरुवात सुद्धा केली आहे.