esakal | जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलनं पडलं महागात; साताऱ्यात 15 जणांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Police

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलनं पडलं महागात; साताऱ्यात 15 जणांवर कारवाई

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून विनाकारण फिरणे व मास्कचा वापर न करणाऱ्या 15 जणांवर कारवाई केली आहे. पोवई नाका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर विनाकारण फिरून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकिल अमीर काझी (रा. पिरवाडी), अभय सुका महाली (रा. भोसले कॉलनी, कोडोली), तनुश्री चैतन्य भिसे (रा. वाढेफाटा) या तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुनील कर्णे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. (Police Action Against 15 People In Satara)

हवालदार पी. एल. भिसे तपास करत आहेत. शहर पोलिस ठाण्यातील हवालदार विकास शिंदे यांच्या फिर्यादीवरून सुयोग राजकुमार वनारसे (रा. निशिगंधा हाउसिंग सोसायटी, औद्योगिक वसाहत), प्रशांत प्रभाकर सोनमळे (रा. पिरवाडी), राजू गुरप्पा चव्हाण (रा. संजीवनी सोसायटी, शाहूनगर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार जी. बी. कारळे तपास करत आहेत. हवालदार संभाजी जगताप यांच्या फिर्यादीनुसार अल्ताफ जमाल शेख, अत्तार अल्ताफ शेख (दोघे रा. रविवार पेठ), सनिराज नामदेव जाधव (रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा), महम्मद कलाम अमीर शेख (रा. बॉम्बे रेस्टॉरंट चौक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार पी. एल. भिसे तपास करत आहेत.

पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूरला निघालेल्या ऑक्सिजन टँकरला गळती; साताऱ्यात खळबळ

हवालदार किशोर तारळेकर यांच्या फिर्यादीनुसार मोहित मगनलाल जैन, वक्ताराम आसाराम देसाई (रा. मोळाचा ओढा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार जी. बी. कारळे तपास करत आहेत. हवालदार दीपक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ओमकार बापूसाहेब कणसे (रा. अंगापूर वंदन, ता. सातारा), विठ्ठल ज्ञानदेव देवगिरी (रा. उत्तेकरनगर, सदरबझार) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार पी. एल. भिसे तपास करत आहेत. दरम्यान पोवई नाक्‍यावरील निलकमल फूलविक्रेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या मालकीची चारचाकी फुलांनी सजवत होता. याप्रकरणी हवालदार संजय सपकाळ यांच्या फिर्यादीनुसार भीमराव नामदेव वाघांबरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार जी. बी. कारळे तपास करत आहेत.

Police Action Against 15 People In Satara