पाचगणीत 590 जणांवर पोलिसांची धडक कारवाई; 42 हजारांचा दंड वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Action

पाचगणीत 590 जणांवर पोलिसांची धडक कारवाई; 42 हजारांचा दंड वसूल

sakal_logo
By
सुनील कांबळे

भिलार (सातारा) : पाचगणीत (Pachgani) कडक निर्बंध घालूनही लोक नियमांचे पालन न करता सैराटपणे वागत आहेत. त्यामुळे पोलिसांनी (Police Action) अशा 590 जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून 42 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पाचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार (Police Inspector Satish Pawar) यांनी दिली. (Police Action Against 590 People At Pachgani Satara Marathi News)

जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाउन जाहीर केला असतानाही या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सतर्क केली असून, पोलिस सार्वजनिक ठिकाणी कारवाई करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना पाचगणीकर जुमानत नसल्याचे चित्र सध्या दिसत असून, नियमाचा भंग करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले.

हेही वाचा: महाराजसाहेब.. आम्हाला न्याय द्या; SEBC च्या शिष्टमंडळाचे उदयनराजेंना साकडे

यामध्ये मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, काहीही कारण नसताना बाजारात फिरणे अशा लोकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस ठाणे व नगरपालिका यांच्या संयुक्त वतीने कारवाई केल्या जात असून, नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिक, व्यापारी व इतरांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सांगितले.

Good News : कोरोना रुग्णांसाठी 'माणदेशी'चा श्वास; गरजूंसाठी मदतीचा हात

Police Action Against 590 People At Pachgani Satara Marathi News

loading image
go to top