Satara Police : साताऱ्यात बुलेटराजांवर कारवाईचा बडगा; 8 वाहने, 56 सायलेन्‍सर, 10 सायरन जप्‍त

बुलेटराजांवर (Bullet) सातारा शहर वाहतूक शाखेच्‍या (Satara Traffic Branch) पथकाने कारवाईचा सपाटा लावला आहे.
Shahupuri Police Station
Shahupuri Police Stationesakal
Summary

सायलेन्‍सर आणि हॉर्नमध्‍ये बदल करत हे बुलेटराजा फटाके फोडल्‍याचा आवाज करत वर्दळीच्‍या रस्त्यावरून वेगात जात असत.

सातारा : सातारा शहरासह परिसरात सायलेन्‍सर आणि हॉर्नमध्‍ये बदल करत सर्वसामान्‍यांच्‍या कानठळ्या बसविणाऱ्या बुलेटराजांवर (Bullet) सातारा शहर वाहतूक शाखेच्‍या (Satara Traffic Branch) पथकाने कारवाईचा सपाटा लावला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात (Shahupuri Police Station) आठ जणांवर गुन्‍हा नोंदवत बुलेट जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत. आज दिवसभरात कारवाई करत वाहतूक शाखेने ५६ मॉडीफाय सायलेन्‍सर, तसेच दहा सायरन असे पाच लाखांचे साहित्‍य वाहतूक शाखेने जप्‍त केले.

सातारा शहरात गेल्‍या काही दिवसांपासून बुलेटराजांनी धुमाकूळ घातला होता. सायलेन्‍सर आणि हॉर्नमध्‍ये बदल करत हे बुलेटराजा फटाके फोडल्‍याचा आवाज करत वर्दळीच्‍या रस्त्यावरून वेगात जात असत. यामुळे सर्वसामान्‍य पादचाऱ्यांसह इतर वाहनधारकांच्‍या कानठळ्या बसत असत. या बुलेटराजांवर कारवाई करण्‍याची मागणी साताऱ्यातील नागरिकांकडून होत होती. यानुसार गेल्‍या दोन दिवसांपासून वाहतूक शाखेने अशा बुलेट व इतर वाहनांवर कारवाई करण्‍याची मोहीम उघडली आहे.

Shahupuri Police Station
Kolhapur Loksabha : '..म्हणून कोल्हापुरात मान गादीला आणि मत मोदींना असं चालत नाही’; सतेज पाटलांचा थेट निशाणा

कारवाईदरम्‍यान मोती चौक, गोलबाग, गिते बिल्‍डिंगसह इतर भागात रात्रीच्‍या वेळी बुलेट, यामाहासह इतर वाहनांची तपासणी करण्‍यात आली. तपासणीत बुलेटच्‍या ठेवणीत बदल केल्‍याचे आढळले. यानुसार याप्रकरणी संबंधित बुलेटचालक, मालकांवर शाहूपुरी, तसेच सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला. गुन्‍हा दाखल झालेल्‍यांमध्‍ये स्‍वप्‍नील रामचंद्र भोसले (रा. श्री व सौ अपार्टमेंट, पोवई नाका), ओमकार संजय हाके (रा. धनगरवाडी, कोडोली), अनिरुद्ध जयराज देवदारे (रा. गुरुवार पेठ), महेश दिनकर कांबळे (रा. गोलमारुतीजवळ, यादोगोपाळ पेठ), सिद्धांत संतोष माने (रा. रविवार पेठ), प्रथमेश विजयकुमार पुणेकर (रा. सोमवार पेठ) यांच्‍यासह दोन अनोळखी बुलेट चालकांचा समावेश आहे.

Shahupuri Police Station
Sangli Loksabha : उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटली! सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसची हतबलता; बालेकिल्ला निसटणार?

याची तक्रार हवालदार सूरज रेळेकर, अभिजित सुतार, चंद्रकांत टकले, कुमार जाधव यांनी नोंदवली असून, तपास उपनिरीक्षक जाधव, उपनिरीक्षक पवार, हवालदार सुडके, हवालदार भोसले, हवालदार कदम, पाटोळे हे करीत आहेत. शनिवारी वाहतूक शाखेने वाहनांची तपासणी करत ५६ सायलेन्‍सर, १० सायरन जप्‍त केले असून, याप्रकरणी संबंधितांवर शाहूपुरी, सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com