esakal | निंभोऱ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; फलटणातील 12 जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

निंभोऱ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; फलटणातील 12 जणांना अटक

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : निंभोरे (ता. फलटण) येथील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारत तब्बल 12 लाख रुपयांचा ऐवज घटनास्थळावरून जप्त केला आहे. या प्रकरणी 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की रविवारी (ता. 2) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निंभोरे येथे पोलिसांनी छापा मारला. त्या वेळी तेथे पत्त्याच्या पानांवर पैसे लावून तीन पानी पत्त्याच्या डावाचा जुगार चालला होता. तेथे जमलेल्यांनी संचारबंदीचे उल्लंघन करण्याबरोबरच मास्कही वापरले नव्हते. या प्रकरणी बबन जगन्नाथ मानकर (रा. ल्हासुर्णे ता. इंदापूर), दयानंद किसन गाडे (रा. शिवताकरवाडी, ता. पुरंदर), ओंकार अरुण तपासे (रा. मल्हार पेठ, सातारा), किरण एकनाथ गाडे (रा. कापूरहोळ ता. भोर), समीर जमशेद मुलाणी (रा. पिंप्रद, ता. फलटण), गजानन महादेव डोंबाळे (रा. डोंबाळवाडी, ता. फलटण), राजेश शेवंतीलाल शहा (रा. निंभोरे, ता. फलटण), अनिल अंकुश यादव (रा. तरवडी लोणी काळभोर, ता. हवेली), महेश बाळू जगताप (रा. मंगळवार पेठ, फलटण), चंदन अशोक काकडे (रा. कोळकी, ता. फलटण), शरद बाळू खवळे (रा. निंभोरे, ता. फलटण), रितेश रामस्वरूप नंदा (रा. हडपसर, पुणे) यांच्या विरुद्ध जुगार प्रतिबंधक, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आदी कलमांद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला असून, सर्वांना अटक करण्यात आली आहे.

जावलीत कोरोनाचा कहर; तालुक्यात 115 हून अधिक रुग्णांचा बळी, प्रशासनाकडून तत्काळ 'दखल'

पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, पत्त्याची पाने, रोख रक्कम व दोन चार चाकी वाहने असा एकंदरीत 12 लाख 8 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार तुकाराम सावंत यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा ग्रामीणच्या पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल, सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले, पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख, सहायक पोलिस फौजदार यादव, पोलिस कॉन्स्टेबल अभिजित काशिद, सचिन पाटोळे, वैभव शिंदे, शुभम चव्हाण, विशाल कोरडे, नीलेश जांभळे, उज्ज्वल कदम, अनिकेत दीक्षित यांनी केली आहे.

Edited By : Balkrishna Madhale

loading image