स्वस्तात सोन्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांना लुटले; तिघांना अटक

स्वस्तात सोन्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांना लुटले; तिघांना अटक

दहिवडी (जि. सातारा) : स्वस्तात सोने देतो, असे सांगून पावणेदोन लाख रुपयांना लुटणाऱ्या तिघांना दहिवडी पोलिसांनी अटक केली असून, दोघेजण फरारी आहेत. त्यांच्यावर दरोडा, घातक शस्त्राने जखमी करणे तसेच फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
याबाबतची माहिती अशी, लखन पोपट भोसले याने तौफीक हारुणअली मुलाणी (वय 29, रा. जयराम स्वामी वडगाव, ता.खटाव) यांना माझा मित्र अडचणीत आहे. त्याच्याकडून तुला स्वस्तात सोने देतो, असे सांगितले. त्यानुसार 20 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लखन भोसले याने त्याच्या मोटरसायकलवरून गावावरून दहिवडी हद्दीतील गंगासागर हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रस्त्याने पुढे नेले. तेथील कालव्याजवळ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नेऊन लघुशंका करण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली. तेथे लखनने इतर चार साथीदारांच्या मदतीने तौफीक यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यातील एकाने तौफीकच्या गळ्यास धारदार हत्यार लाऊन एक लाख 80 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. लखन भोसले याने कोणास काही सांगितले तर तुझ्या घरादारास खल्लास करीन, अशी धमकी तौफीकला दिली व सर्वजण पळून गेले.
 
चंदन चोरीप्रकरणी दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या घटनेची तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक तसेच पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अतिशय शिताफीने या घटनेतील संशयित अभिजित कालिदास पवार (वय 21, रा.वेटणे, ता.खटाव), घायल रायचूर शिंदे (वय 25, रा. कटगुण, ता. खटाव), प्रवीण पोपट भोसले (वय 30, रा. दहिवडी) यांना ताब्यात घेऊन अटक केली.

आज काय आहे तुमच्या भविष्यात? जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

सर्व संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील मुख्य संशयित फरारी आहे. ही कारवाई राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश हांगे, हवालदार संजय केंगले, पोलिस नाईक रवींद्र बनसोडे, पोलिस शिपाई प्रमोद कदम, गजानन वाघमारे, केतन बर्गे व लखन कुचेकर यांच्या पथकाने यशस्वी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com