esakal | युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

two arrested

युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांना अटक

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सहा पैकी मुख्य सुत्रधारासह दोघांना आज रात्री उशिरा अटक केली. ओंकार दिलीप खबाले-पाटील (वय २२) व रोहन मोहन घोरपडे (२३, दोघे रा. विंग) अशी अटक केलेल्यांची नाव आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, आगाशिवनगर येथील मंगेश कडवचा मृतदेह वारणा नदीत आढळला होता. तत्पुर्वी दोन सप्टेंबर रोजी मंगेशला विंग येथील ओंकारसह त्याच्या चार मित्रांसह बहिणीने मारहाण केली होती. त्यानंतर मंगेश बेपत्ता होता. तीन दिवस शोध घेऊन त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. शोध सुरू असतानाच सांगली जिल्ह्यातील कणेगावच्या हद्दीतील वारणा नदीत मंगेशचा मुतदेह सापडल्याने खळबळ उडाली.

हेही वाचा: शहापुरात महिलांच्या दोन गटांत जोरदार धुमश्चक्री; आठ महिलांवर गुन्हा

त्याबाबत मंगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल ओंकारसह सहाजणांवर कऱ्हाड तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला. काल रात्री उसिरा सहायक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते यांच्यासह पोलीस पथकाने छापा टाकून संशयीत ओंकारला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला शनिवपर्यंत ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर रोहनला रात्री उशिरा पोलिसांनी अठक केली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सहायक निरीक्षक दुधभाते तपास करीत आहेत.

loading image
go to top