esakal | शहापुरात महिलांच्या दोन गटांत जोरदार धुमश्चक्री; आठ महिलांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

शहापुरात महिलांच्या दोन गटांत जोरदार धुमश्चक्री; आठ महिलांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मसूर (सातारा) : शहापूर (ता. कऱ्हाड) येथे सामायिक बोळातील नळ चालू केलेच्या कारणावरून महिलांच्या दोन गटांत मोठी धुमश्चक्री झाली. लोखंडी विळा, दांडक्याने मारहाणीत महिला जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांतील आठ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा: 48 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आंबेनळी घाटातील वाहतूक सुरु;पाहा व्हिडिओ

पोलिसांची माहिती अशी, विद्या आबासाहेब चव्हाण यांनी घराच्या पाठीमागील सामायिक बोळात पाणी भरण्यासाठी नळ सुरू केला असता तेथे शेजारी राहणाऱ्या गौरी रामचंद्र चव्हाण, वनिता रामचंद्र चव्हाण या त्या ठिकाणी आल्या. त्यांनी चव्हाण यांना आमचे जागेतला नळ सुरू का केला, नळ बंद करा, असे म्हणत नळ बंद केला.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढविणार

त्यांनी नळ का बंद केला असे म्हणाल्याच्या कारणावरून वनिता चव्हाण व विद्या चव्हाण यांच्यात मारामारी झाली. त्यावरून विद्या चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौरी चव्हाण, वनिता चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, विद्या चव्हाण, विमल आनंदराव चव्हाण, पुष्पलता सुनील चव्हाण, संयोगिता सुनील चव्हाण, सुनीता पवार, निकिता पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मसूर पोलिस करत आहेत.

loading image
go to top