esakal | शेवरीत अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांचा छापा; दोन महिलांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Liquor

शेवरी (ता. माण) येथे अवैध दारूविक्रेत्यांवर छापा टाकून दहिवडी पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.

शेवरीत अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांचा छापा; दोन महिलांना अटक

sakal_logo
By
प्रवीण जाधव

दहिवडी (सातारा) : शेवरी (ता. माण) येथे अवैध दारूविक्रेत्यांवर (Liquor Case) छापा टाकून दहिवडी पोलिसांनी सुमारे 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शेवरी येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ (Rajkumar Bhujbal) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित (Pramod Dixit) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. (Police Have Arrested Two Women From Shewari In A Liquor Case Satara Crime News)

त्या वेळी पोलिसांनी उषाताई साहेबराव चव्हाण या महिलेच्या घराच्या भिंतीच्या कडेला खाकी रंगाच्या खोक्‍यात असलेल्या देशी दारूच्या 96 बाटल्या हस्तगत केल्या. याची किंमत सुमारे पाच हजार रुपये असून, पोलिसांनी श्रीमती चव्हाण यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यानंतर लगेच त्याच गावातील भारती अशोक शिंदे यांच्याकडून सुमारे 23 हजार रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारूच्या 280 बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या. भारती शिंदे यांनाही ताब्यात घेण्यात आले.

या पथकात पोलिस हवालदार संजय केंगले, पोलिस नाईक नीलेश काळोखे, पोलिस शिपाई ए. के. पाटोळे, पोलिस नाईक रूपाली फडतरे, पोलिस शिपाई बी. जी. चंदनशिवे, पोलिस नाईक एस. ए. चव्हाण यांचा समावेश होता. या गुन्ह्यांचा तपास पोलिस नाईक रूपाली फडतरे व पोलिस नाईक नीता पळे करत आहेत.

Police Have Arrested Two Women From Shewari In A Liquor Case Satara Crime News

हेही वाचा: पशुखाद्य व्यापाऱ्याकडून उकळले दोन लाख; एकास अटक

loading image